

पुणे: बहुतांश भागांत रविवारी (दि. 27) मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांचा समावेश आहे. मात्र, सोमवारपासून राज्यातील पाऊस कमी होत असून, पाच दिवसांचा खंड राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Latest Pune News)
उत्तर छत्तीसगड आणि त्याच्या आसपास कमी दाबाचा प्रभाव आहे. त्यामूळे पूर्व मध्य प्रदेश, कोकण, मध्य महाराष्ट्र व घाटभागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टी, तसेच घाट परिसरात मान्सून आणखी तीन दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणातील घाटभागामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होईल.