

पुणे : राज्यातील कमाल तापमानात वेगाने वाढ होत असून सोमवारी विदर्भातील अकोला येथे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तसेच १६ व १७ एप्रील रोजी या उष्णलहरी अधिक तीव्र होणार असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.ढ़
रविवार पासून राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून ही लाट १८ एप्रील पर्यंत तीव्र राहिल असा अंदाज आहे.त्यामुळे कोकण,मध्यमहाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भाला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.राज्याचे सरासरी तापमान ४१ ते ४२ अंशापेक्षा जास्त जाईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात गत चोवीस तासांत उष्णलहरी तीव्र झाल्या असून अकोला येथे रविवारी ४२ तर सोमवारी ४३ अंश सेल्सिअस तामपानाची नोंद झाली.राज्यात १६ व १७ रोजी उष्ण व दमट हवामान राहणार आहे.त्यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या पाणी बॉटल,गॉगल,टोपी घालून बाहेर पडा.सतत उन्हात फिरुन नका.असा सावधानतेचा इशारा तज्ञांनी दिला आहे.
सोमवारचे तापमान...
अकोला ४३,पुणे ४०,कोल्हापूर ३९,मुंबई ३४.२,जळगाव ४१.६, महाबळेश्वर ३४.७, मालेगाव ४१.४, नाशिक ३९.५, सांगली ४१, सातारा ४०, सोलापूर ४१.६, धाराशिव ४०, छ. संभाजीनगर ४०.४, परभणी ४१.७,अकोला ४३.१, अमरावती ४२.४, बुलढाणा ४०.६, ब्रह्मपुरी ३९.६, चंद्रपूर ४१,गोंदिया ४०.५, नागपूर ४१.४, वाशिम ४१.६, वर्धा ४०, यवतमाळ ४०.२.