FDA Raids Pune: दिवाळीपूर्वी एफडीएची मोठी कारवाई; २५ आस्थापनांतून ३४.१७ लाखांचा खाद्यसाठा जप्त

पुण्यासह सहा जिल्ह्यांतील २५ आस्थापनांवर छापे टाकून ६८३ किलो खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले. तसेच १२ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.
FDA Food Safety Action
FDA Food Safety ActionPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळीच्या सणासाठी मिठाई, फरसाण आणि खाद्यतेलाची खरेदी करण्याची लगबग सुरू असतानाच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यासह पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमधील २५ आस्थापनांवर छापे टाकून तब्बल ३४ लाख १७ हजार रुपयांचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यसाठा जप्त केला. यात ६८३ किलो खाद्यपदार्थ नष्ट केले, तर १२ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत.

अन्न औषध प्रशासनाने सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुणे शहरातील गणेश पेठेतून १,७९६ किलो तूप, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून ३,१४६.८ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले.

FDA Food Safety Action
Pune Crime : सुकामेवा, नूडल्सच्या पाकिटांत हायड्रोपोनिक गांजा; पुणे विमानतळावर पावणेचार कोटींचा अमली साठा जप्त

या दोन्ही ठिकाणच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा साठा आढळून आला. पुण्यातील बाणेर, वानवडी, गणेश पेठ, देहू, एरंडवणे, कोथरूड, मुंढवा आदी भागांतील मिठाई आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करून मोतीचूर लाडू, बुंदी, बर्फी, मावा, खवा, तूप, फरसाण आणि ड्रायफ्रूट पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

FDA Food Safety Action
Pune News : रेलटेलचा सर्व्हर डाऊन; सरकारी कार्यालयांमधील कामकाज ठप्प

परवाना निलंबित केलेल्या आस्थापना

न्यू गायत्री ट्रेडर्स, द्वारका स्वीट्स, बालाजी ड्रायफ्रूट्स, अजय वेफर्स (धनकवडी), मे. जय भवानी वेफर्स, मे. न्यू बालाजी बेकर्स (सांगली), श्रीलक्ष्मी फूड प्रॉडक्शन (देहू), ओम् स्वीट्स (निगडी), बालाजी ड्राय फ्रूट (शिरूर), शिवाजी स्वीट्स, (बारामती) , बंगलोर अय्यंगार बेकर्स (कोल्हापूर), जय गणेश लाडूवाला (पिंपरी-चिंचवड) या आस्थापनांमध्ये अन्न व्यवसाय तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याची कारवाई केली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी आवश्यक परवाना अथवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा. उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छता राखावी, खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक व हाताळणी करावी आणि अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे.

- श्रीकांत करकळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.