

पुणे : यंदाच्या हंगामातील थंडीची सर्वात मोठी लाट कायम असून, २२ दिवस झाले तरी ती कमी झालेली नाही. दरम्यान रविवारी अहिल्यानगर ७.५, पुणे १०.१ अंशांवर होते.
यंदा ६ डिसेंबरपासून सुरू झालेली थंडीची लाट अजूनही सुरूच असून रविवारी या लाटेला २२ दिवस पूर्ण झाले. यंदाच्या हंगामातील ही थंडीची सर्वात मोठी लाट मानली जात आहे. दरम्यान १ जानेवारीपासून थंडीत घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अहिल्यानगर ७.५, पुणे १०.१, जळगाव ११, कोल्हापूर १४.७, महाबळेश्वर १२, मालेगाव १०.२, नाशिक १०.६, सांगली १२.४, सातारा ११.१, सोलापूर १५.४, छ. संभाजीनगर ११.५, परभणी १.२, अकोला १२.५, अमरावती ११.५, बुलढाणा १३, ब्रम्हपुरी ११.१, चंद्रपूर १२.२, गोंदिया ९, नागपूर ९.८, वाशीम ११.६, वर्धा ११, यवतमाळ १०.४.