Maharashtra Assembly Polls: महाराष्ट्राला लुटणार्‍या गद्दारांना घरी पाठवा; आदित्य ठाकरेंची टीका

'महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणाऱ्या गद्दारांना या निवडणुकीत धडा शिकवा'
Aditya Thackeray
महाराष्ट्राला लुटणार्‍या गद्दारांना घरी पाठवा; आदित्य ठाकरेंची टीका file photo
Published on
Updated on

Aditya Thackeray News: हवा थंड असली तरी वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील एक लाख युवकांना रोजगार मिळवून देणारा तळेगावतील वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प भाजपप्रणीत शिंदे खोके सरकारने गुजरातला पाठवला यांनी एकच नाही तर शेकडो प्रकल्प गुजरातला पाठवले.

त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसला, आपला पक्ष फोडला, शरद पवार यांचा पक्षच नाही तर घर फोडले, पण हे एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आपला महाराष्ट्र फोडला, महाराष्ट्र लुटला, महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणाऱ्या गद्दारांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे जाहीर आवाहन युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी येथे केले.

Aditya Thackeray
कोल्हापूरवरचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी राजू लाटकरांना साथ द्या : आ. सतेज पाटील

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ आळंदी येथे माजी पर्यावरणमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी पक्षाचे उपनेते सचिन आहिर, जगन्नाथ शेवाळे, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, नितीन गोरे, विजया शिंदे, भगवान वैराट, राजू जवळेकर, विजय शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपने गौरी लंकेशच्या खुन्याला आपल्या पक्षात घेतले, बलात्काराच्या पक्षाच्या नेत्यांना लाडका भाऊ समजू का, मग दीड हजारांमध्ये तुमचे मत विकणार आहात का, असा सवाल उपस्थित केला.

आपण लाडकी बहीण योजना बंद करणार नाही तर दुप्पट तीन हजार रुपये देणार आहोत. वर्षाला मोफत सहा गॅस सिलिंडर देणार आहोत, महिलांना मोफत बससेवा देणार आहोत. महिला, युवक, शेतकरी भाजपसोबत नसल्याचे लोकसभेत लक्षात आल्याने त्यांनी या योजना आणल्या आहेत.

Aditya Thackeray
Maharashtra Assembly Poll : जनतेच्या मनातील सरकार आणले : एकनाथ शिंदे

आळंदीचा वारकरी विधानसभेचा मानकरी

या वेळी बोलताना बाबाजी काळे म्हणाले की, माझे आजोबा, वडील, आजी, आई आणि मी माळकरी आहे. मीदेखील माळकरी असून, मला या माउलीचा आशीर्वाद असून, एकादशीच्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली आहे. आळंदीचा हा वारकरी आता विधानसभेचा मानकरी म्हणून पाठवण्याचे तालुक्यातील वारकऱ्यांनी निश्चित केले असल्याचा विश्वास बाबाजी काळे यांनी येथे व्यक्त केला. तालुक्यात इंद्रायणी नदी प्रदूषण, कचऱ्याचा गंभीर प्रश्न आहे. गुंडगिरी मोडीत काढायची आहे. धनशक्ती विरोधी जनशक्ती अशी लढाई होत आहे. आपल्याला मलिदा गँगचा म्होरक्या आमदार पाहिजे की, पंढरीचा वारकरी हे आता तालुक्यातील जनता ठरवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news