11th Admission 2026 | सलग दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन; अकरावी प्रवेशाचे संकेत स्थळ ठप्प, अर्जासाठी २५ मे पर्यंत मुदतवाढ

पहिल्या फेरीची निवड यादी (First Merit List) शुक्रवारी, २९ मे रोजी जाहीर केली जाणार आहे
11th Admission 2026
11th Admission 2026pudhari photo
Published on
Updated on

पुणे: राज्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाला (Website) सलग दुसऱ्या दिवशीही तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले आहे. शुक्रवारी (दि.२२ मे) पुन्हा एकदा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला असून, अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

11th Admission 2026
11th Admission : अकरावीच्या प्रवेश पोर्टलचा पहिल्याच दिवशी बोजवारा

आता २५ मे पर्यंत संधी

संकेतस्थळ ठप्प झाल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश अर्जाचा 'भाग २' (Part 2) आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम (Option Form) भरण्यासाठी आता सोमवार २५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज पूर्ण करण्यासाठी आणखी काही अवधी मिळणार आहे.

11th Admission 2026
11th Admission : अकरावी प्रवेशाचे रडगाणे दुसऱ्या दिवशीही कायम !

पहिली गुणवत्ता यादी 'या' दिवशी!

प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात झालेल्या या बदलामुळे आता पहिल्या फेरीची निवड यादी (First Merit List) शुक्रवारी, २९ मे रोजी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी सर्व्हर सुरळीत झाल्यावर घाईगडबड न करता दिलेल्या मुदतीत आपले पसंतीक्रम काळजीपूर्वक भरून घ्यावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news