.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
काल अर्ज मागे घेण्याचा अखेरच्या दिवशी पुणे शहरातील कसबा शिवाजीनगर खडकवासल्यात पर्वतीतून आबा बागुल कसब्यातून कमल व्यवहारे खडकवासल्यातून राहुल मतेंचे अर्ज कायम राहिले आहेत. त्यामुळे तीनही मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडाळी पाहायला मिळाली.
तर पुणे ग्रामीणमध्ये पुरंदर, भोर, इंदापूर, मावळ, जुन्नर मध्ये महायुतीला बंडखोरांचा फटका बसला आहे. भोरमध्ये किरण दगडे भाजप, शिंदे सेना कुलदीप कोंडे यांची उमेदवारी कायम आहे. तर पुरंदर विधानसभेत विजय शिवतारे यांच्या विरोधात अजित पवार गटांचे संभाजी झेंडे यांची उमेदवारी कायम आहे.
जुन्नर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल बेनके यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर आशा बूचके यांची उमेदवारी कायम आहे. तर मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात बापू भेगडे यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. इथे महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण चित्र महाविकास आघाडी विरोधात महायुती असेच आहे.