‌TET Exam Application Date Extended : ‘टीईटी‌’च्या अर्जांसाठी मुदतवाढ; 24 एप्रिलपर्यंत भरता येणार अर्ज

Maharashtra TET exam : उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
TET exam
TET exam deadline extended (Pudhari Photo)
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार उमेदवारांना 24 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

परीक्षा परिषदेने 25 मार्चला टीईटीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार 21 जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 27 मार्च ते 16 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, उमेदवारांनी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची विनंती परीक्षा परिषदेकडे केली होती.

या पार्श्वभूमीवर,परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठीची मुदत 24 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. टीईटी परीक्षेचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 9 जून ते 21 जूनदरम्यान प्रवेश अर्जाची मुद्रित प्रत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news