‘गे अ‍ॅप’वरील ओळखीतून लूटमारीचे सत्र कायम

संगम पुलाजवळ मारहाण करत तरुणाला लुटले
Pune Fraud News
‘गे अ‍ॅप’वरील ओळखीतून लूटमारीचे सत्र कायमFile Photo
Published on
Updated on

पुणे: ‘गे अ‍ॅप’वर झालेल्या ओळखीतून शहरात लुटमारीचे सत्र कायम आहे. पिंपरीतील एका तरुणाला संगम पूल परिसरात बोलावून चौघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्याच्याकडील साडेनऊ हजारांची रोकड लुटून पसार झालेल्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शाहरुख टॉप नावाचा आरोपी तसेच त्याच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास संगम पूल परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण पिंपरी परिसरात राहायला आहे. आरोपींची त्याची एका ’गे अ‍ॅप’वरून ओळख झाली होती. आरोपींनी 18 मार्च रोजी त्यांना मंगळवार पेठेतील आरटीओ चौकात भेटण्यासाठी बोलाविले. त्यानंतर रेल्वे रुळालगत असलेल्या मोकळ्या जागेत त्याला नेण्यात आले. आरोपींनी तरुणाला धमकावून पैशांची मागणी केली.

आरोपींनी त्याला मारहाण करून त्याच्याकडील डेबीट कार्ड, मोबाईल आणि गाडीची चावी काढून घेतली. त्यानंतर डेबीट कार्डचा पिन क्रमांक घेऊन एटीएमधून 9 हजार 500 रुपये काढून घेतले. आरोपींनी परत फिर्यादीकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. परंतु त्याने देण्यास नकार दिला. दरम्यान, काही वेळाने शाहरूख टॉप परत तिथे आले. त्यानंतर चौघा आरोपींनी परत तरुणाला लाकडी फांदी आणि हाताने बेदम मारहाण केली.

हा प्रकार घडल्यानंतर तरुणाने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार तपास करत आहेत. काही विशिष्ट व्यक्ती एकत्र भेटण्यासाठी एका अ‍ॅपचा वापर केला जातो. या अ‍ॅपचा वापर करून चोरट्यांनी गेल्या दोन महिन्यांत पाच ते सहा जणांना लुटले आहे.

धायरी भागात एका व्यावसायिकाला धमकावून चोरट्यांनी लुटले होते, तसेच मगरपट्टा सिट्टी भागात एका संगणक अभियंत्याला धमकावून लूटमार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news