पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमधील 21 मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी येणार्या मतदारांचे फुले देऊन स्वागत करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक अशी ही 21 आदर्श मतदान केंद्रे जिल्हा निवडणूक शाखेने निश्चित केली आहेत. जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यानुसार जुन्नरमध्ये जिल्हा परिषद शाळा, वडगाव आनंद, आंबेगावमध्ये जिल्हा परिषद शाळा पूर्वाभिमुख उत्तरेकडून खोली क्र. एक, खेड-आळंदीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकी खुर्द, शिरूरमध्ये न. पा. सेंट्रल स्कूल घोड नदी, दौंडमध्ये सेंट सेबॅस्टियन हायस्कूल, दौंड, इंदापुरात श्री. एन. आर. हायस्कूल इंदापूर, बारामतीमध्ये नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे, पुरंदरमध्ये ऑर्कडि इंटरनॅशनल स्कूल, भोरमध्ये ब्लू रिज पब्लिक स्कूल, हिंजवडी उत्तरमुखी, पश्चिमेकडून खोली क्र. चार आणि मावळात ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, मेन बिल्डिंग, लोणावळा या ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे असणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.