नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : मुखई गावाशी माझे जुने ऋणानुबंध राहिले आहेत. या गावासाठी कामे करताना मी कधीच मागे-पुढे पाहिले नाही. येथील बैलगाडा घाटाला निधी दिला. खरेतर तुमच्या गावाने मला घरातल्या माणसाप्रमाणे जपले आहे, असे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुखई येथे केले. महायुतीच्या शिरूर मतदारसंघातील प्रचारार्थ आयोजित दौर्यानिमित्त ते मुखई येथे आले होते. त्या वेळी त्यांनी मुखईचे ग्रामदैवत काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणाईचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भाजप नेत्या जयश्रीताई पलांडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सचिव आबासाहेब पर्हाड, बाजार समितीचे सभापती प्रकाश पवार, आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिरूरचे शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, भाजप शिरूरचे उपाध्यक्ष भगवानराव शेळके, जिल्हा चिटणीस वैभव ढोकले, गावातील प्रतिष्ठित मान्यवर अॅड. सुरेश पलांडे, सतीश पलांडे, माजी सरपंच अतुल धुमाळ, सुदाम थोरवे, सचिन पलांडे, सुरेश पलांडे, विजयराव येवले, दादासाहेब धुमाळ, बूथप्रमुख प्रशांत पलांडे, योगेश पलांडे, अमोल थोरवे यांच्यासह महायुतीतील घटकपक्षांचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. धामारी, करंदी, जातेगाव, मुखई, हिवरे, खैरेवाडी, खैरेनगर, पाबळ येथे सर्वच ठिकाणी आढळराव पाटील यांच्या प्रचार दौर्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा