Ketan Murder Case: लुल्लानगरमध्ये केतनला ढकलून मारण्याचा सराव

दोघांची भेट कॅफेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याच ठिकाणी या दोघांनी केतनच्या खुनाच्या प्लॅनिंगची शेवटची चर्चा केल्याचा संशय आहे.
Ketan Agarwal Murder Case
Ketan Agarwal Murder CasePudhari
Published on
Updated on

पुणे: सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी केतन अगरवाल याला लोहगडावरून ढकलून कसे मारायचे याचा सराव मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लुल्लानगर येथील सेक्टर-३७ परिसरात दोन वेळा केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे, तर १८ जूनच्या आदल्या दिवशी म्हणजेच १७ जून रोजी हे दोघे लुल्लानगर येथील थर्ड व्हेव कॅफेत एकत्र भेटले होते. दोघांची भेट कॅफेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याच ठिकाणी या दोघांनी केतनच्या खुनाच्या प्लॅनिंगची शेवटची चर्चा केल्याचा संशय आहे.

केतन अगरवाल याचा त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने १८ जून रोजी लोहगडावरून ढकलून खून केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून पडल्याचा बनाव सियाने केला होता.

मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांना अटक केली. सिया आणि चेतन यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांच्या पोलिस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे.

Ketan Agarwal Murder Case
ITI Admission: 'दहावी'ला १०० टक्के गुण मिळवणारे २३ विद्यार्थी 'आयटीआय प्रवेशा'च्या शर्यतीत

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते.

त्यामुळे लग्न मोडण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला होता. त्यासाठी आरोपींनी यूट्यूब आणि गुगलच्या माध्यमातून खून करण्याच्या विविध पद्धतींची माहिती शोधली. विष देऊन मारणे, कायमचे अपंग करणे किंवा अपघात घडवून आणणे यांसारख्या पर्यायांचाही त्यांनी अभ्यास केला.

Ketan Agarwal Murder Case
Nasrapur Case Protest: नसरापूर प्रकरणाचे राज्यभर उमटले तीव्र पडसाद

तपासात पुढे असेही निष्पन्न झाले की, ३१ मे रोजी केतन प्रथमच सियाला लोहगडावर घेऊन गेला होता. त्याच वेळी तेथेच त्याचा खून करण्याची कल्पना तिच्या मनात आली होती. त्याबाबत तिने चेतन चौधरीशीही चर्चा केली होती. यानंतर सिया आणि चेतन यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लुल्लानगर येथील सेक्टर-३७ परिसरात दोन वेळा प्रत्यक्ष सराव करून लोहगडावर केतनला कशा प्रकारे ढकलून देता येईल, याचे नियोजन केल्याचे तपासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news