पिंपरी : मोरवाडीतील लिंगायत दफनभूमी होणार सुरू

Work is underway to prune the trees growing in Shivkailas Lingayat burial ground in morwadi.
Work is underway to prune the trees growing in Shivkailas Lingayat burial ground in morwadi.

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमी दोन वर्षांपासून बंद होती. त्याशिवाय स्मशानभूमीत मृतांना दफन करण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नसल्याने गैरसोय होत असल्याची बातमी 'मोरवाडी येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था' आणि 'मोरवाडीतील लिंगायत दफनभूमी दोन वर्षांपासून बंद' अशा मथळ्याखाली दै. पुढारीमध्ये प्रसिद्ध होताच त्याची प्रशासनाने दखल घेतली.शिवकैलास लिंगायत दफनभूमी तत्काळ सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमी दोन वर्षांपासून बंद होती. त्यामुळे शेजारी असलेल्या स्मशानभूमीमध्येच दफन केले जात होते. मात्र, या स्मशानभूमीत मृतांना दफन करण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही.

त्यामुळे येथील पदपथ उकरून दफन करण्यात आले. त्यासंबधी दै. पुढारीमध्ये बातमी प्रसिद्ध होताच त्याची दखल घेण्यात आली. त्यामुळे शिवकैलास लिंगायत दफनभूमी तत्काळ सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

बंद असलेल्या शिवकैलास लिंगायत दफन भूमीमध्ये वृक्षांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे येथे वाढलेल्या वृक्षांची छाटणी करण्याच्या कामाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. त्यासोबतच स्वच्छतेचे काम सुरू आहे. तसेच दफनभूमीत काळी पोयटा माती टाकण्यात येणार असून त्वरित दफनभूमी सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

https://youtu.be/yV0Fs94q0mw

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news