

Latest Weather Update News
पुणे: राज्यात उष्ण लहरींचा उद्रेक सुरू झाला असून, यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान मंगळवारी चंद्रपूर 45.8, तर ब्रह्मपुरी 45.2 अंशांवर गेले होते. त्यामुळे हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
हिमालय ते काश्मीर या भागात पाऊस सुरू आहे. तर, मध्य आणि दक्षिण भारतात उष्णतेचा उद्रेक सुरू आहे. महाराष्ट्र मध्य भारतात मोडत असल्याने उष्ण लहरींचा सर्वाधिक परिणाम विदर्भावर झाला असून, तेथील सरासरी कमाल तापमान 44 ते 45 अंशांवर गेले आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही शहरांत पारा 42 ते 43 अंशांवर गेला आहे. पुणे शहरातील लोहगाव येथे सलग चारवेळा पारा 43.2 अंशांवर गेला होता.
दरम्यान, विदर्भातील अमरावती वगळता सर्वच जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झाली असून चंद्रपूरचे तापमान तिसर्या दिवशीही उष्ण राहिले. मंगळवारी तिसर्या दिवशीही 0.2 अंशाने वाढ होऊन येथील तापमान 45.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरीचे तापमानात 45.2 अंश नोंदवले गेले.
राज्यातील शहरांचे मंगळवारचे तापमान
चंद्रपूर 45.8, ब्रह्मपुरी 45.2, अकोला 44.8, अमरावती 44.4, गोंदिया 42.7, नागपूर 44.2,वर्धा 44.2, वाशिम 43.5, बुलडाणा 40.4, पुणे (लोहगाव 43.2, शिवाजीनगर 41.2), अहिल्यानगर 41.2, जळगाव 42.8, कोल्हापूर 38.8, महाबळेश्वर 34.1, मालेगाव 42.8, नाशिक 40.5, सांगली 40.8, सातारा 40.9, सोलापूर 43.4, मुंबई 33.9, रत्नागिरी 34.9, धाराशिव 42.5, छ. संभाजीनगर 41.6