एक रुपयात कुर्ती...राजगुरुनगरमध्ये महिलांची फसवणूक

महिला बसल्या रस्त्यावर; दुकानाचे नाव पोहोचले सर्वदूर
Pune Khed News
एक रुपयात कुर्ती... राजगुरुनगरमध्ये महिलांची फसवणूकPudhari
Published on
Updated on

खेड: महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि दुकान चर्चेत यावे यासाठी राजगुरुनगर शहरातील एका दुकानदाराने एक रुपयात कुर्ती अशी ऑफर देऊन गर्दी झाल्यावर दुकान बंद करून पळ काढल्याचा प्रकार घडला.

या फसवणुकीवरून रांगेत ताटकळत उभे राहिलेल्या महिलांनी थेट रस्त्यावर बसण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांची धांदल उडाली. प्रजासत्ताकदिनी घडलेल्या या प्रकारामुळे शहरात दुकानाची चर्चा झाली, मात्र दुकानदाराला तेच हवे होते असे सखोल माहिती घेतली असता समोर आले आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील एका दुकानदाराने खास महिलांसाठी 1 रुपयात कुर्ती अशी फसवी योजना राबवली. मोठ्या स्वरूपात तशी जाहिरातबाजी केली. रविवारी (दि. 26) दुकान सुरू झाले आणि एक रुपयात कुर्ती मिळते असे समजल्यावर महिलांनी मोठी गर्दी केली.

एकमेकींना संपर्क साधला आणि गर्दी झाली, मोठ्या रांगा लागल्या, तसे दुकानदाराने दुकान बंद केले. त्यामुळे कुर्ती खरेदीसाठी आलेल्या आणि चार तासांपेक्षा अधिक वेळ रांगेत उभ्या असलेल्या शेकडो महिला आक्रमक झाल्या.

दुकानदाराच्या विरोधात त्याच जागी आंदोलन आणि घोषणाबाजी सुरू केली. चार ते पाच तास रांगेत उभे राहून कुर्ती मिळत नसल्याने आणि त्यातच दुकानदाराने दुकान बंद करून पोबारा केल्याने महिलावर्ग अजूनच आक्रमक झाला. त्यांनी थेट दुकानापुढील वाडा रस्त्यावर उतरून रस्ता रोखून धरला. आक्रमक झालेल्या महिलांना रस्त्यातून बाजूला करण्यासाठी पोलिसांना यावे लागले.

पोलीस अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्यानंतर महिलांनी रस्ता मोकळा केला. मात्र, एक रुपयात कुर्ती घेणे महिलांना चांगलेच त्रासदायक ठरले. दुकानदाराने केलेल्या या फसवणुकीबाबत कारवाईची पोलिसांकडे मागणी करण्यात आली. पोलिसांकडून सोमवारी (दि. 27) सायंकाळपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती. याबाबत दुकानचालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news