Kurkumbh drug case : ‘मेफेड्रॉन’मध्ये ईडीची एन्ट्री : पुणे पोलिसांकडे पत्रव्यवहार

Kurkumbh drug case : ‘मेफेड्रॉन’मध्ये ईडीची एन्ट्री : पुणे पोलिसांकडे पत्रव्यवहार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ ड्रग्ज रॅकेट प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माहिती मागवली आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडे पत्रव्यवहार करून ईडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणाची माहिती मागवली. पुणे पोलिसांनी 3700 कोटींहून अधिक किमतीचे मेफेड्रॉन जप्त करून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यात अटक केलेले आरोपी भारतातील विविध राज्यांतील आहेत. तसेच, या रॅकेटची आर्थिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. त्यामुळे ईडीने या प्रकरणात एन्ट्री केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज तस्करी करणार्‍या दोघांना पकडले. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे विश्रांतवाडीतील हैदर शेखच्या मिठाच्या गोदामापर्यंत पोहोचले.

तेथे देखील पोलिसांना ड्रग्जचा मोठा साठा हाती लागला. अधिक चौकशी केली असता ते ड्रग्ज कुरकुंभमधील अर्थकेम लॅबोरेटरी कारखान्यात तयार करण्यात येत असल्याचे समोर आले. मध्यरात्री पोलिसांनी तेथे छापा टाकून दुसरा मोठा साठा जप्त केला. तेथील ड्रग्ज दिल्ली आणि सांगलीत पाठविल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर तब्बल 16 पथके तयार करून दिल्ली, नवी मुंबई, सांगली, बिहार यांसह देशातील काही मेट्रोसिटीमध्ये पोलिसांनी छापेमारी केली. त्यावेळी दिल्लीत 970 किलो ड्रग्ज साठा पोलिसांना सापडला. ते ड्रग्ज तेथून पुढे लंडनकडे विमानाने जाणार होते. तर दुसरीकडे सांगलीत छापा टाकून 48 किलो ड्रग्ज जप्त केले. आतापर्यंत या प्रकरणात अकरा जणांना अटक झाली आहे. त्यातील काही जणांची रवानगी येरवडा कारागृहात केली तर काही जणांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली असता अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. त्याच कारणातून ईडीने आता याबाबत माहिती घेतली आहे. दरम्यान, यापूर्वी या ड्रग्ज रॅकेटची माहिती एनसीबी, एटीएस, आयबी, एनआयए यांनीही घेतली आहे.

धुनियाच्या प्रेयसीचीही चौकशी

संदीप धुनियाची प्रेयसी सोमन कुमारी पंडित हिला बिहारमधील पुर्नियामधून ताब्यात घेत तिला चौकशीसाठी पुण्यात आणले आहे. तिच्याकडे फरार धुनियाबाबत कसून चौकशी सुरू आहे. सोमन कुमारी ही त्याच्या मित्राची पत्नी आहे. प्रेमजाळ्यात अडकवून धुनियाने तिचा वापर सीमकार्ड विकत घेणे, घर भाड्याने घेणे यासाठी केल्याचे तपासातून समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर धुनियाने तिचा वापर कोर्टाच्या कामांसाठी केला. पुण्यातदेखील त्यांनी एक सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news