Pune Minor Girl Rescue Case: कोंढव्यात छापा; अल्पवयीन मुलीची सुटका, दोन दलाल अटकेत

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाची कारवाई; POCSOसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल
Minor Girl Rescue
Minor Girl RescuePudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील एका इमारतीच्या सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाने कारवाई केली. या वेळी एका पीडित अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायातून सुटका करून दोन दलालांना अटक केली आहे.

Minor Girl Rescue
Pune Municipal Corporation Sports Budget: पुणे महापालिकेचा क्रीडा विभागासाठी 102.60 कोटींचा भव्य आराखडा

गुलनाज रफिक शेख (वय 25), इस्माईल इबाहीम खान (वय 32, रा. दोघे भाग्योदयनगर कोंढवा) अशी त्या दलालांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार तुषार भिवरकर यांच्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कायद्यासह, बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाला एका सोसायटीच्या सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

Minor Girl Rescue
Pune PWD Safai Karmachari Salary Issue: पुण्यात PWD मधील 15 सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत; राष्ट्रीय आयोगाची नोटीस

त्यानुसार पथकाने बनावट ग््रााहक पाठवून खात्री केली. त्यानंतर 21 फेबुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास छापा टाकला असता, हा प्रकार समोर आला. दोन दलाल पीडित मुलीला पैशांचे आमिष आणि धाकदपटशा करून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होते. तसेच तिच्या वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून ठराविक रक्कम स्वतः घेऊन उदरनिर्वाह करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news