

Indapur Crime: चाकूने सपासप वार करुन एका महिलेचा खून करण्यात आला आहे. सुनिता शेंडे (वय ३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून त्या इंदापूर तालुक्यातील शेंडेवस्ती निमगांव केतकी येथील रहिवासी आहेत.
शेंडे या जानाई लक्ष्मी महिला सहकारी पतसस्थेच्या अध्यक्षा असून समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब शेंडे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांचा खून झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर रासकर (रा. सुरवड, ता. इंदापुर) याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. ४) रात्री निमगाव केतकी-सराफवाडी रस्त्यावरील पत्र्याच्या शेडखाली घडली आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणाने झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.