

राजगुरुनगर: पाईट-शिरोली (ता. खेड) रस्त्यावर कोये गावाचे हद्दीत लग्न वऱ्हाडाची बस आणि माल वाहतुक करणारा टेम्पो यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातात काही नागरिकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघात घडुन गेल्यावर या ठिकाणी काही वेळ प्रचंड गोंधळ उडाला होता.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी माहिती मिळाल्यावर तातडीने पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाईट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेत काही जखमी नागरिकांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रांतधिकारी अनिल दौंडे आणि चांडोली आरोग्य अधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे. अपघातात चालक गाडीत अडकल्याने त्यांना काढायला उशीर झाला. स्थानिकांच्या मदतीने तेही सुखरूप बाहेर पडले आहेत.