

वेल्हे: पानशेतसह सर्व चारही धरणक्षेत्रात शुक्रवार (4) सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासल्याच्या विसर्गात कपात करण्यात आली आहे, सध्या धरणातून 1 हजार 655 क्सुसेक्स पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 17. 37 टीएमसी म्हणजे 59.58 टक्के साठा झाला होता.
टेमघर येथे 1 जूनपासून 4 जुलैपर्यंत 1 हजार 338 मिलिमीटर इतका उच्चांकी पाऊस पडला. या कालावधीत पानशेत येथे 952, वरसगाव येथे 962 तर खडकवासला येथे 371 मिलिमीटर पाऊस पडला. (Latest Pune News)
पावसाचा जोर ओसरला असला तरी ओढ्या-नाल्यांतुन येणार्या पाण्यामुळे धरणसाखळीत गेल्या 24 तासात अर्धा टीएमसी पेक्षा अधिक म्हणजे 0.59 टीएमसीची वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात टेमघर येथे 16, वरसगाव येथे 6, पानशेत येथे 6 व खडकवासला येथे 1 मिलिमीटर पाऊस पडला.