Ketan Agarwal murder case: सिया गोयलला घेऊन पोलीस लोहगडावर; पोलिसांनी कसं केलं केतनच्या हत्येच रिक्रिएशन? VIDEO

पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी घटनास्थळी ‘सीन रिक्रिएशन’ केले आहे.

Ketan Agarwal murder case

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी घटनास्थळी ‘सीन रिक्रिएशन’ केले आहे. आज, रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल हिला लोहगड किल्ल्यावर नेले. १८ जून रोजी याच किल्ल्यावरून केतन अग्रवाल यांचा दरीत कोसळून संशयास्पद मृत्यू झाला होता.

नेमके काय घडलं? पोलिसांनी समजून घेतला घटनाक्रम

लोहगड किल्ल्यावरील ज्या कड्यावरून केतन अग्रवाल यांना ढकलण्यात आले होते, तंतोतंत त्याच ठिकाणी नेऊन पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. घटना घडली त्या दिवशी नेमके काय झाले? कोण कुठे उभे होते? आणि केतन अग्रवाल दरीत कसा कोसळला? याचे प्रात्यक्षिक पोलिसांनी आरोपीकडून करून घेतले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनला ज्या जागेवरून दरीत ढकलले, त्याच निश्चित जागेची पडताळणी आज करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news