Farm Pump Cable Theft: काठापूर गाव शेतीपंपांच्या केबल चोरीने हैराण; चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

या चोरांना पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
pimparkhed news
काठापूर गाव शेतीपंपांच्या केबल चोरीने हैराण; चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान Pudhari
Published on
Updated on

पिंपरखेड: काठापूर (ता. शिरूर) गाव हे कृषीपंपाच्या केबलचोरीने हैराण झाले आहे. येथे होणार्‍या सततच्या केबलचोरीमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या चोरांना पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच काठापूर येथील घोडनदीवरील सहा शेतीपंपाच्या अंदाजे एकूण नऊशे मीटर केबल चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना बुधवारी (दि.27 ) पहाटेच्या सुमारास घडली आहे. यात शेतकर्‍यांचे एकूण अंदाजे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. केबल चोरीच्या वारंवार घटना घडूनही केबल चोर पोलिसांना सापडत नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर परिसरातील शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Pune News)

pimparkhed news
AI in farming: शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘एआय’ ठरणार गेमचेंजर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

काठापूर येथे घोडनदी किनारी शेतकर्‍यांच्या शेतीपंपाच्या केबल चोरी करणारांचे धाड सत्र सुरूच आहे. आता चोरट्यांनी येथील दामोदर पाबळे यांची 200 मीटर, रोहित दाते यांची 400, मनोहर पवारांची 100 मीटर, रघुनाथ दाते यांची 200 मीटर, पुनम राहुटे 150 मीटर, तर गणेश दाते यांची 30 मीटर केबल लंपास केली आहे.

या परिसरात मागील आठवड्यात शेतीपंपाच्या केबल चोरी गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर लगेच सहा शेतकर्‍यांना फटका बसला आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही अनेक शेती पंपाच्या केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत. एका शेतीपंपाला पुन्हा नवीन केबल टाकण्यासाठी कमीतकमी 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च येतो. या वाढत्या चोर्‍यांमुळे येथील शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे.

pimparkhed news
Yashwant Sugar Factory: हवेलीत ‘दादांचा वादा’ पूर्ण! विधानसभेतील शब्द पाळला; ‘यशवंत’ सुरू होण्याचे संकेत

दरम्यान, बेटभागातल पिंपरखेड, काठापूर, जांबूत, चांडोह, शरदवाडी येथील नदी किनारी केबल चोरीच्या घटना नेहमीच घडतात. त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करूनही आजपर्यंत पोलिसांना केबलचोरांना अटक करता आलेली नाही. या चोरीच्या घटनांकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानेच या चोरांचे फावत असल्याचा आरोप येथील शेतकरी करत आहेत. आता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांंनी या चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काठापूर परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news