Kasturi Club : कस्तुरींच्या आनंदमेळ्यामध्ये रंगणार बहारदार लावणी..

Kasturi Club : कस्तुरींच्या आनंदमेळ्यामध्ये रंगणार बहारदार लावणी..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुढारी कस्तुरी क्लब आयोजित सोनी मराठी प्रस्तुत 'महाराष्ट्रची शान लावणी' हा बहारदार लावणी कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या वेळी नृत्यबिजली मंजू वाघमारे व सहनृत्यांगना नृत्य सादर करणार आहेत. सोनी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिकेतील कलाकार आणि इंडियन आयडॉल मराठीवरील गायिका व कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे.

सुप्रसिद्ध मालिका 'गाथा नवनाथांची' या मालिकेतील नागनाथ यांची भूमिका साकारणारे बालकलाकार आरुष बेडेकर, 'राणी मी होणार'मधील उमा आणि मल्हार, 'निवेदिता माझी ताई' या मालिकेतील निवेदिता आणि यशोधन, इंडियन आयडॉल मराठी या कार्यक्रमातील सुरेल गायिका भाग्यश्री टिकले आणि सुरभी कुलकर्णी हे कलाकार उपस्थित राहणार आहेत.

  • येणार्‍या प्रत्येक महिलेस चंद्रकलाताई शेडगे यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू मिळणार
  • महाराष्ट्रीय पेहराव करणार्‍या भाग्यवान 75 कस्तुरींना दी प्रसाद भांबुरडेकर ज्वेलर्सकडून आकर्षक भेटवस्तू
  • लकी विनरला योगेश टाईगर ब्रँड रेडी टू कूक यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर
  • डॉ. भोर डेंटल क्लिनिककडून फ्री डेंटल चेकअप कूपन आणि लकी ड्रॉ विजेतीला मोत्यांचा सेट मिळणार

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news