Kasba By Election : कसबा पोटनिवडणुकीत रंगत वाढणार! उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योजक बालन यांच्यात बैठक

Kasba By Election : कसबा पोटनिवडणुकीत रंगत वाढणार! उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योजक बालन यांच्यात बैठक
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पोटनिवडणूकीने राजकीय वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्यात बैठक झाली. गणेश मंडळाचे आधारस्तंभ असलेल्या बालन यांच्या माध्यमातून कसबामध्ये महत्वाची मदत होऊ शकते या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

कसबा पोटनिवडणूकीत आता स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आमदार सिदार्थ शिरोळे यांच्या निवासस्थानी काही महत्वाच्या निवडक व्यक्तीशी भेट घेऊन चर्चा केली. यात उद्योजक बालन यांच्याशीही तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे चर्चा केल्याचे समोर आले. यावर्षी झालेल्या गणेशोत्सवात मध्य पुण्यातील आणि प्रामुख्याने कसबा मतदार संघातील दीडशेहून अधिक गणेश मंडळांना पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत करण्यात आली होती. या मदतीमुळे कोरोना साथीनंतरचा गणेशोत्सव मंडळांना चांगल्या पद्धतीने साजरा करता येऊ शकले होता. या मदतीमुळे हजारो गणेश मंडळाचे कार्यकर्ते बालन यांच्याशी व्यक्तीशी जोडली गेलेली आहेत. आता या पोटनिवडणुकीत गणेश मंडळाची भुमिका अत्यंत निर्णायक अशी ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि बालन यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत बालन यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

फडणवीस यांच्या समवेतच्या बैठकीनंतर आता बालन हे कसबा पोटनिवडणुकीत काय भुमिका घेणार आणि प्रत्यक्ष प्रचारात उतरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news