Maharashtra Assembly Polls: ‘राष्ट्रवादी’तच काँटे की टक्कर

Elections 2024: माजी आमदारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Ajit pawar, sharad pawar
‘राष्ट्रवादी’तच काँटे की टक्कर (file photo)
Published on
Updated on

Pune Politics: सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे तीन दिवस राहिले असल्याने वडगाव शेरी मतदारसंघात सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आजी-माजी आमदारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडत असून, विद्यमान आमदारांनी गड राखण्यासाठी, तर माजी आमदारांनी गड पुन्हा खेचून आणण्याचा चंग बांधला आहे.

काहीही झाले तरी मतदारसंघात आपले वर्चस्व राहावे आणि आपला विजय होऊन सत्ता आपलीच यावी, यासाठी सर्वच नेतेमंडळी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. मागील काही निवडणुकांमध्ये अत्यंत कमी फरकाने उमेदवार विजयी झाल्याने सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी चांगलाच जोर लावला असून, मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे चित्र आहे.

Ajit pawar, sharad pawar
Maharashtra Assembly Polls: आज-उद्या जगते राहोची रात्र; प्रचाराची रणधुमाळी आज संपणार

कल्याणीनगर, विमाननगर यासह खराडीसारखा उच्चभ्रू भाग, तर चंदननगर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, धानोरी आदी मध्यमवर्गीय भागासह मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांचा भाग आणि काही ग्रामीण भाग असणार्‍या वडगाव शेरी मतदारसंगातील उमेदवारांकडून पदयात्रा, दुचाकी-जीप रॅली, मेळावे, बैठका अशा पारंपरिक पध्दतीच्या प्रचारावर देण्यात येत आहे.

तर, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांकडून मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटीगाठीसाठी अधिक प्राधान्य दिले जात आहे. प्रचारादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून स्थानिक प्रश्नांवर भर देण्यात येत आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुतीकडून केलेली कामे, समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे दाखले दिले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ 2014 साली भाजपच्या ताब्यात गेला. त्यानंतर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सध्या महायुतीत घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी भारतीय जनता पक्षाचे जगदीश मुळीक यांचा अवघ्या 4 हजार 975 मतांनी पराभव करत विजय मिळविला होता.

Ajit pawar, sharad pawar
मुश्रीफ गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारे प्रामाणिक नेते

यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये एकत्र आले असून, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे, एकतर्फी लढत होईल असा अंदाज होता. मात्र, ऐनवेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून उमेदवारी खेचून आणल्याने लढतीत रंगत आणली.

महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या सुनील टिंगरे यांच्याकडून मतदारसंघात करण्यात आलेल्या कामांचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. टिंगरे यांनी फॉर्म भरल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार जगदीश मुळीक प्रचार सक्रिय झाले. त्यामुळे, महायुती एकसंध झाल्याचे चित्र प्रचारतही दिसून येत आहे.

याखेरीज, माजी आमदार असताना केलेली कामे, शरद पवारांना नागरिकांचा मिळणारा पाठिंबा या मुद्द्यांवर पिता-पुत्रांनी जोर लावला आहे. महायुतीसह महाविकास आघाडीही एकसंघ असल्याचे प्रचारातून दिसून येत आहे. एकंदरीत महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनही जोरदार प्रचाराचा धडाका लावला असून, या दोघांमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे चित्र आहे.

Ajit pawar, sharad pawar
दादांच्या प्रारंभाची, काकांच्या अस्तित्वाची लढाई!

दुसर्‍यांदा आमदार होण्यासाठी चढाओढ

वडगाव शेरी मतदारसंघातून 24 उमेदवारांनी अर्ज भरले होते. अर्ज माघारीच्या दिवशी सैनिक समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या दोन नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे, सध्यस्थितीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडीसह अन्य पक्ष तसेच अपक्ष अशा 16 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

यामध्ये, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे सुनील टिंगरे व नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे बापूसाहेब पठारे यांमध्ये प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र आहे. याखेरीज, बहुजन समाज पार्टीचे हुलगेश चलवादी, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विवेक लोंढे हेही चांगली लढत देतील, असे चित्र आहे.

प्रचारात हे ठरताहेत प्रमुख मुद्दे

  • नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी

  • खराडी चौकात उड्डाणपूल व भुयारी मार्ग

  • नव्याने समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा

  • परिसरात वाढलेले अतिक्रमण

  • अनियमित व अपुरा पाणीपुरवठा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news