Pune : जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती
Pune News
अपक्ष आमदार शरद सोनवणे pudhari
Published on
Updated on

नारायणगाव : जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शुक्रवारी (दि. २८) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुमारे ४०० समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः आ. सोनवणे यांनी दिली. नारायणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, मुक्ताई देवस्थानचे विश्वस्त विकास तोडकरी, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट आदी उपस्थित होते.

आ. सोनवणे म्हणाले, येत्या शुक्रवारी नारायणगाव येथे पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असून, येथे आयोजित मेळाव्यात पक्षप्रवेश होणार आहे. नारायणगाव येथील पूर्व वेशीजवळ त्यांची जाहीर सभा होणार आहे. या वेळी पुणे जिल्ह्यातून अनेकांचे प्रवेश शिवसेना पक्षात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार बाळासाहेब दांगट, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी सदस्य प्रसन्न डोके, पंचायत समितीचे माजी उपसभापती अंजना कोरडे, माजी सदस्य जीवन शिंदे, सुरज वाजगे आदींसह ४०० हून अधिक कार्यकर्ते या वेळी शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news