Junnar Leopard Cubs Found: जुन्नर तालुक्यातील धोलवड येथे ऊसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळले

शिवनेरी विद्यालयाजवळील शेतात पिल्ले आढळताच वनविभागाची तातडीची कारवाई; आईशी पुनर्भेट घडवून आणण्याची तयारी
Junnar Leopard Cubs
Junnar Leopard Cubs Pudhari
Published on
Updated on

ओतूर: जुन्नर तालुक्यातील धोलवड येथे ऊसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याची घटना सोमवारी (दि. १६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. शिवनेरी विद्यालयाजवळील मारुती कसार यांच्या शेतात ही पिल्ले दिसून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Junnar Leopard Cubs
Haveli Taluka Election Spending: हवेली तालुक्यात निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची दैना सुरू

या घटनेची माहिती दै. 'पुढारी'चे प्रतिनिधी बापू रसाळे यांनी वनविभागाला दिल्यानंतर ओतूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी सारिका बुट्टे व विश्वनाथ बेले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बिबट्याचे तीन बछडे यांना सुरक्षित ताब्यात घेतले.

Junnar Leopard Cubs
Khed Panchayat Samiti Sabhapati Election: खेड पंचायत समितीत सभापती निवडीसाठी हालचालींना वेग

वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, बछडे यांची आई जवळपास परिसरात असल्याची शक्यता असून सायंकाळच्या सुमारास आई व बछडे पुनर्भेट घडवून आणण्यासाठी त्यांना त्याच परिसरात नैसर्गिक अधिवासात सोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांनी बछडे यांना पाहण्यासाठी गर्दी करू नये तसेच वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news