जुई, मोगर्‍याचा सुगंध हजारी पार

मार्केट यार्डात जुई 1100, मोगरा 1 हजार, तर चमेली 600 रुपये किलो
flower market
फुल मार्केट pudhari
Published on
Updated on

शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाल्यानंतर देवीला वाहण्यासह केसांमध्ये माळण्यासाठी जुई, मोगरा, चमेलीच्या गजर्‍याच्या खरेदीकडे महिलावर्गाचा कल वाढला आहे. परिणामी, बाजारात ही फुले चांगलाच भाव खाऊ लागली आहेत. गुरुवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील फूलबाजारात जुईच्या किलोला 1 हजार 100 रुपये, मोगर्‍याला 1 हजार रुपये तर चमेलीला 600 हजार रुपये दर मिळाला. तर, या फुलांपासून तयार करण्यात आलेला गजर्‍याची एका नगाची 20 ते 50 रुपये विक्री सुरू आहे.

गणपती, दिवाळीच्या तुलनेत नवरात्रींमध्ये सुवासिक असलेल्या जुई, मोगरा, चाफा आणि चमेलीच्या फुलांना महिलावर्गाची अधिक पसंती मिळते. अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर म्हणाले, सद्यस्थितीत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजारात म्हातोबाची आळंदी, कुंजीरवाडी भागातून जुई, तळेगाव ढमढेरे परिसरातून चमेली तर दक्षिणेतील राज्यातील मोगरा मुंबईमार्गे दाखल होत आहे. गुरूवारी चमेलीची 12 तर जुईची 58 किलोंची आवक झाली. शुक्रवारी शेवटचा उपवास तसेच शनिवारी दसरा असल्याने गुरूवारी जुई, मोगरा आणि चमेलीच्या फुलांना मोठी मागणी राहिली.

फुले जुई चमेली

दर (प्रतिकिलो) 1 हजार 100 रुपये 600 रुपये

आवक 58 किलो 12 किलो

टिकाऊ दोन दिवस एक दिवस

गजरा दर 20 ते 50 रुपये

कागडा, शेवंतीच्या वेणींनाही पसंती

बाजारात कर्नाटकातील गदग येथून कागड्याची आवक होत आहे. कर्नाटक एसटी बसेसद्वारे तेथील व्यापारी मार्केट यार्डात माल विक्रीसाठी पाठवितात. याखेरीज, शहरातील नांदेड सिटी, शिवणे आदी स्थानिक भागातून काही प्रमाणात मालाची आवक होत असून दररोज जवळपास 575 किलो माल बाजारात दाखल होत आहे. सुट्ट्या पुड्यांसह लड स्वरूपात ही आवक होत आहे. कागड्याच्या किलोला 500 ते 600 रुपये तर मोगर्‍याला 800 ते 1000 रुपये दर मिळत आहे. यवत, माळशिरस तसेच नगर भागातील सुपा, पारनेरमधून शेवंती बाजारात विक्रीसाठी येत आहे. वेणीसाठी शेवंतीच्या फुलांना मागणी असून त्याच्या प्रतिकिलोस प्रतवारीनुसार 100 ते 300 रुपये भाव मिळत आहे

नवरात्रीच्या अनुषंगाने शहरातील गजरे तसेच फूल विक्रेत्यांकडून जुई, चमेलीच्या फुलांसह कागडा व मोगर्‍याच्या गजर्‍याला मागणी वाढली आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने फुलांच्या दरात दरवाढ झाली आहे. उद्या (दि. 11) पर्यंत हेच दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

सागर भोसले, फुलांचे व्यापारी, मार्केट यार्ड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news