सासवड: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारात धान्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. बुधवारी (दि. 3) ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 3 हजार 451 रुपयांचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली.
सासवड उपबाजारात वाघापूर, माळशिरस, परिंचे, वाल्हा, राजुरी, गराडे, दिवे यासह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते. (Latest Pune News)
बुधवारी सासवड उपबाजारात एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 3 हजार 451 रुपये, तर दोन नंबर प्रतिच्या ज्वारीला किमान 2 हजार 600 हजार रुपये, तर सरासरी 3 हजार 25 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, असे समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले.
या वेळी सभापती संदीप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, देविदास कामठे, गणेश होले, भाऊसाहेब गुलदगड, पंकज निलाखे, वामन भाऊ कामठे, अनिल माने, अशोक निगडे, लिपीक विकास कांबळे यांसह व्यापारी आर. के. ट्रेडर्सचे रुपचंद कांडगे, आर.आर.ट्रेडर्सचे राजेंद्र जळींद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश वीरकर आदी उपस्थित होते.
यासह निरा बाजार समिती आवारात गुळाची आवक 246 बॉक्स म्हणजेच 49 क्विंटल असल्याची माहिती गुळबाजाराची माहिती सहसचिव नितिन किकले, कृष्णात खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी दिली. या वेळी गुळ व्यापारी शांतिकुमार कोठडिया उपस्थित होते.