JEE Mains Result : जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राचा निकाल 20 एप्रिलपर्यंत, परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर

एनटीएने देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 2 एप्रिल ते 8 एप्रिल यादरम्यान जेईई मेन्स सत्र 2 परीक्षा घेतली होती.
JEE Mains Result : जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राचा निकाल 20 एप्रिलपर्यंत, परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर
Published on
Updated on

पुणे : जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर केली आहे. एनटीएच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थ्यांना उत्तरसूची डाऊनलोड करता येणार असून, सोमवारी (दि. 13) रात्री 11.50 पर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. संबंधित परीक्षेचा निकाल 20 एप्रिलपर्यंत लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एनटीएने देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 2 एप्रिल ते 8 एप्रिल यादरम्यान जेईई मेन्स सत्र 2 परीक्षा घेतली होती. त्याची उत्तरतालिका आता प्रसिद्ध झाली आहे. उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल. एनटीएच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, आक्षेप नोंदविण्याची विंडो सुरू केली आहे.

उमेदवार 13 एप्रिल रात्री 11.50 पर्यंत अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपले आक्षेप नोंदवू शकतात. सर्व उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी आक्षेप नोंदविण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यानंतर उमेदवारांना दुसरी संधी दिली जाणार नाही. आक्षेप नोंदविण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक प्रश्नासाठी 200 रुपये आक्षेप शुल्कही भरावे लागेल तसेच सर्व उमेदवारांना निकाल डाऊनलोड करण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news