

बारामती: २०२९ ला विधानसभेचा उमेदवार मी असावा अशी बारामतीतील जनतेची इच्छा आहे, पण मला मात्र पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत राहायचे आहे, असे मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी व्यक्त केले.
मातोश्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत ते काठेवाडी मतदान केंद्रावर आले होते. त्यांचे मतदान काटेवाडी नव्हे तर बारामतीत आहे. पण मातोश्रीसोबत ते काटेवाडीत होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी बारामती तालुक्यात फिरत असताना आगामी विधानसभा मी लढवावी, असा जनतेचा आग्रह आहे. पण मला मात्र पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत राहायचे आहे. अर्थात आगामी काळातील योग्य ते निर्णय पक्ष घेईल.