Pune News
Drinking WaterPudhari

Drinking Water Purity: पुणेकरांनो! तुम्ही पिताय ते पाणी शुद्ध आहे का?

शहरात काही भागांत अस्वच्छ व गढूळ पाण्याचा पुरवठा
Published on

पुणे : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार पसरण्याचा धोका असतो. घरात नळाला येत असलेले पाणी स्वच्छ दिसत असले, तरीही त्यात अनेक छोटे जीवजंतू असू शकतात. शहरात काही भागांत अस्वच्छ व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून, पुणेकर जे पाणी पित आहेत ते स्वच्छ व शुद्ध आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साठल्याने ड्रेनेजदेखील तुंबू लागले आहेत. हेच पाणी जलवाहिन्यांत जात असल्याने शहरातील काही भागात गढूळ व अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. शहरात गिलियन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी काही परिसरात मोजके रुग्ण सापडू लागले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्व्हे सुरू आहे, तसेच आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. शहराला पाणीपुरवठा करण्यापूर्वी धरणातून आलेल्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात पाण्याच्या प्रमाणानुसार पीएसी औषध मिसळले जाते.

Pune News
Pune Metro: पुणेकरांची गर्दीतून सुटका; लवकरच मेट्रोच्या ताफ्यात 15 नव्या ट्रेन, 45 डबे वाढणार

मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करताना पाणीपुरवठा विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.पुण्यात प्रामुख्याने धायरी, न-हे, खडकवासला, नांदेड सिटी, किरकटवाडी, विमाननगर, येरवडा, वडगाव शेरी, चंदननगर, हडपसर येथील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. अनेक सोसायट्यांनी क्षेत्रीय कार्यालय तसेच पालिकेत येऊन दूषित पाण्याच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र, यावर तुटपुंजे उपाय करण्यात आले असून, अशुद्ध पाण्याचा पुरवठा सुरूच असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

Pune News
Pune Crime: ऑपरेशन मूनलाईट अन् ‘त्या’ गुन्ह्याचा छडा... तपासासाठी पोलिस झाले सेल्समन

जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतावाढीची गरज

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या जुन्या प्लांटची शुद्धीकरण करण्याची क्षमता कमी आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत आहे. यामुळे पाणी शुद्ध करण्यात येऊनही काही भागात गढूळ व अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. लवकरच ही समस्या दूर करू, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

अशी तपासा पाण्याची शुद्धता

  • एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून घ्या. त्या पाण्याचा रंग तपासा. पाण्याचा रंग पिवळा किंवा तपकिरी असेल आणि पाण्यात छोटे छोटे कण दिसत असतील तर ते पाणी दूषित आहे. घरातल्या वॉटर फिल्टरमधून देखील असे पाणी येत असेल तर त्याची सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे.

  • पाण्याची पीएच पातळी तपासूनही पाण्याची शुद्धता तपासता येते. ग्लासात पाणी घेऊन त्यात लिटमस कागद घालावा. तसेच पीएच पातळी तपासण्यासाठी यंत्रेदेखील उपलब्ध आहेत. लिटमस तपासणीत पातळी 7 किंवा 8 असेल तर ते पाणी पिण्यायोग्य नाही.

  • पाणी शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी टीडीएस मशीनदेखील वापरली जाते. वॉटर फिल्टरसह हे मशीन मिळते. शुद्ध पाणी तपासण्यासाठी मशीनमधील पातळी 100 ते 125 पार्ट्स प्रतिमिलियन दरम्यान असावे, तसे नसेल तर ते पाणी पिण्यायोग्य नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news