आयपीएस दर्जाचा अधिकारी नेमणार; स्वारगेट ST प्रकारणानंतर माधुरी मिसाळ यांचा महत्वाचा निर्णय

स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेचा घेतला आढावा
Madhuri Misal
आयपीएस दर्जाचा अधिकारी नेमणार; स्वारगेट ST प्रकारणानंतर माधुरी मिसाळ यांचा महत्वाचा निर्णयFile Photo
Published on
Updated on

पुणे: स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपोत घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या अनुषंगाने शनिवारी (दि. 1) एसटीच्या पुणे विभागीय मुख्यालयातील बैठकीत परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट आगारातील सुरक्षा कर्मचारी वाढविणे, यासोबतच एसटी महामंडळात एक सुरक्षारक्षक कमिटी नेमून, त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचे सांगितले.

स्वारगेट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री मिसाळ यांनी एसटी महामंडळ आणि पोलिस अधिकार्‍यांची शनिवारी (दि. 1) आढावा बैठक घेतली. या वेळी पोलिस उपायुक्त (वाहतूक) अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल, प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) अर्चना गायकवाड, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्यासह एसटी, पोलिस आणि आरटीओ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मिसाळ यांनी सांगितले की, पूर्वीसारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नव्याने नेमण्यात येतील. पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. स्वारगेट स्थानकात यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यांची संख्यादेखील आता वाढविण्यात येईल. महिला सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करण्याची गरज आहे, त्या तत्काळ करणार असल्याचे सांगताना या प्रकरणाच्या ऑडिटमध्ये जे कोणी अधिकारी किंवा ठेकेदार दोषी असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

एसटी बसस्थानकाच्या आवारात तक्रार निवारण कक्ष, तक्रार नोंदवण्यासाठी एक टोल फ—ी क्रमांक राज्यात दिला जाईल. तसेच खासगी बसचालकांची एसटी स्थानकात होणारी घुसखोरी रोखण्यासाठीदेखील उपाययोजना आखण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या स्क्रॅप पॉलिसीनुसार ज्या बस स्क्रॅप करण्याची गरज आहे, त्या सर्व आगारातील बस येत्या 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅप करणार असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news