CET Cell : सीईटी सेलला डॅशबोर्डचे वावडे ; प्रवेश प्रक्रियेपासून विद्यार्थी, पालक राहतात अनभिज्ञ

उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या सर्वच अभ्यासक्रमांसाठी हवा डॅशबोर्ड
 सीईटीसेल
CET cellpudhari
Published on
Updated on

गणेश खळदकर

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलमार्फत दरवर्षी उच्च आणि तंत्रशिक्षणच्या व्यवसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. परंतु या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील पूर्ण माहिती विद्यार्थी आणि पालकांना दिली जात नाही. अकरावी प्रवेशासारखी माहिती देणारा डॅशबोर्ड जाणीवपूर्वक उच्च आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचा सीईटीसेलच्या संकेतस्थळावर दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे नेमके कशामुळे सीईटी सेलला डॅशबोर्डचे वावडे आहे असा प्रश्न आता विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केला आहे.

सीईटीसेलमार्फत वेगवेगळ्या 19 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या सीईटी परीक्षांना दरवर्षी तब्बल 11 लाखांवर विद्यार्थी बसतात. संबंधित विद्यार्थी अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी, बी.आर्च, एम.आर्च, विधी तीन वर्षे, पाच वर्षे, बी.प्लॅनिंग, एम.प्लॅनिंग, नर्सिंग, बीसीए/बीबीए/ बीएमएस आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यासाठी केंद्रीय प्रवेश परीक्षा अर्थात कॅपच्या तीन फेर्‍या तसेच संस्थास्तरावरील कोटा प्रवेश आणि कॅप अगेन्स व्हॅकन्सी अशा फेर्‍या राबविण्यात येतात. परंतु याची सर्वकश माहिती विद्यार्थी आणि पालकांना दिली जात नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात अकरावी प्रवेश तसेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. ही प्रवेश प्रक्रिया राबवत असताना संबंधित प्रवेश प्रक्रियेची माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून दिली जाते. तशीच माहिती काही प्रमाणात उच्च शिक्षण विभागामार्फत दिली जाते. गेली काही वर्षे दिली जात असलेली विधी प्रवेशाची माहिती यंदा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तर गेली अनेक वर्षे तंत्रशिक्षण प्रवेशाच्या एकाही अभ्यासक्रमाची माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार केला जातोे. त्यामुळे संबंधित प्रवेशांचा डॅशबोर्ड केला, तर पारदर्शकता येऊन त्याला आळा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच केवळ आर्थिक हित डोळ्यांसमोर ठेवूनच सीईटीसेल प्रवेश प्रक्रियेची त्रोटक माहिती संकेतस्थळावर देत असल्याचा आरोप पालक तसेच विद्यार्थी संघटना करत आहेत. त्यामुळे पुढील वर्षापासून तरी सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा डॅशबोर्ड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news