बारामती: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे उपबाजारात गुरुवारी (दि. 3) रोजी झालेल्या लिलावात सुमारे 21 क्विंटल लिंबांची आवक झाली. उन्हाळ्यामुळे लिंबांची मागणी वाढली असून लिंबाला कमाल 12 हजार तर सरासरी 10 हजार रुपये क्विंटल इतका भाव मिळाला.
समितीमध्ये विविध प्रकारच्या शेतमालाची गुरुवारी 1480 क्विंटल आवक झाली. सध्या तालुक्यात गहू व हरभरा काढणी जवळपास संपत आली असून उन्हाळी ज्वारी काढणीचे काम सुरू आहे. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी यांचीही आवक होत आहे. गुरुवारी समितीत 2189 वाणाच्या गव्हाची 148 क्विंटल आवक झाली.
त्याला किमान 2500 ते कमाल 3200 व सरासरी 2851 रुपये भाव मिळाला. लोकवन गव्हाची 221 क्विंटल आवक झाली. त्याला किमान 2400 तर कमाल 2711 रुपये आणि सरासरी 2600 रुपये भाव मिळाला. खपली गव्हाची 72 क्विंटल आवक झाली. त्याला किमान 2400 ते कमाल 3590 रुपये असा भाव मिळाला.
काळ्या उडदाला सरासरी 6 हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. गावरान ज्वारीची 111 क्विंटल आवक झाली. तिला किमान 2500 ते कमाल 4100 रुपये आणि सरासरी 3 हजार रुपये भाव मिळाला. हायब्रीड ज्वारीची 166 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला किमान 2090 रुपये तर कमाल 2810 रुपये आणि सरासरी 2750 रुपये असा भाव मिळाला. तांबड्या तुरीची 10 क्विंटल आवक झाली.
या तुरीला किमान 5450 रुपये व कमाल 6300 रुपये तर सरासरी 6 हजार रुपये भाव मिळाला. पांढ-या तुरीची 9 क्विंटल आवक झाली. तिला 5556 रुपये किमान तर 6410 रुपये कमाल व 6100 रुपये सरासरी असा भाव मिळाला. महिको बाजरीची 123 क्विंटल आवक झाली. किमान 2480 रुपये तर कमाल 3151 रुपये आणि सरासरी 2800 रुपये भाव राहिला. हायब्रीड बाजरीची 185 क्विंटलची आवक झाली. तिला 1950 रुपये किमान तर 2710 रुपये कमाल आणि 2600 रुपये सरासरी असा भाव मिळाला.
सूर्यफूलाची 17 क्विंटल आवक झाली. सूर्यफुलाला किमान 5600 रुपये तर कमाल 6700 रुपये भाव मिळाला. सरासरी दर 6300 रुपये क्विंटल असा राहिला. गरडा हरभ-याची 150 क्विंटलची आवक झाली. त्याला 5070 रुपये किमान तर 5500 रुपये कमाल व 5450 रुपये सरासरी भाव मिळाला. जाडा हरभ-याची 100 क्विंटलची आवक झाली. 5400 रुपये किमान तर 5870 रुपये कमाल आणि 5625 रुपये सरासरी असा भाव राहिला.
पांढऱ्या हरभऱ्याची अवघी 7 क्विंटल आवक झाली. त्याला किमान 4500 रुपये तर कमाल 7600 रुपये आणि सरासरी 7200 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. भुईमूग शेंगांची 1.60 क्विंटल आवक झाली. शेंगांना 4 हजार रुपये किमान तर 4410 रुपये कमाल असा भाव मिळाला. तांबड्या मकेची 120.60 क्विंटलची आवक झाली. मकेचा 1900 रुपये किमान तर 2260 रुपये कमाल आणि 2180 रुपये सरासरी असा भाव राहिला.
साखरेपेक्षा गुळाला चांगला भाव
बारामती बाजार समितीमध्ये 20 क्विंटल गुळाच्या खड्याची आवक झाली. त्याला सरासरी 3700 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. गूळ बॉक्सची 66 क्विंटल आवक झाली. त्याला किमान 4050 रुपये व कमाल 4300 रुपये आणि सरासरी 4200 रुपये असा भाव मिळाला. साखर कारखान्यांकडील साखर सध्या 3800 ते 3900 रुपये क्विंटलने विक्री होत असताना बॉक्समधील गूळ मात्र 4200 रुपयांवर गेला.