Monsoon Forecast : मान्सून यंदा सरासरीपेक्षा कमी बरसणार, भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर

जून ते सप्टेंबरदरम्यान अल-निनो राहणार सक्रिय, देशात सरासरी ९० ते ९५ टक्केच पावसाचा अंदाज
Monsoon Forecast : मान्सून यंदा सरासरीपेक्षा कमी बरसणार, भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर
pudhari file photo
Published on
Updated on

पुणे : जून ते सप्टेंबर या काळात यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी ९० ते ९५ टक्के (८७ से. मी.), तर महाराष्ट्रात ९२ ते ९५ टक्के इतका अंदाज आहे. कारण या कालावधीत अल-निनो ही मान्सूनला बाधक असणारी स्थिती सक्रिय राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी (१३ एप्रिल ) जाहीर केला.

यंदाच्या मान्सूनचा हा पहिला अंदाज असून, दुसरा अंदाज मेअखेर जाहिर केला जाणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिल्ली मुख्यालयातून दिली. ते म्हणाले की, मार्च ते जूनच्या सुरुवातीपर्यंत भारतीय समुद्री स्थिरांक तटस्थ स्थितीत राहील, असे दिसते आहे. तोवर ला-निना स्थिती आहे. मात्र, जून सुरू होताच पहिल्या आठवड्यापासून मान्सूनला बाधक असणारी अल-निनो स्थिती सक्रिय होत आहे. त्यामुळे यंदा मान्सून देशभरात ९० ते ९५ टक्केच बरसेल, असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news