Indapur sports complex: इंदापूरला होणार मिनी बालेवाडी स्टेडियम

क्रीडा संकुलासाठी 55 कोटींचा निधी मंजूर मंत्री भरणे यांचे प्रयत्न यशस्वी
Indapur news
Indapur sports complexpudhari
Published on
Updated on

वालचंदनगर : इंदापूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे विविध सुखसुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून तब्बल 55 कोटींच्या निधीस मान्यता मिळाली आहे. याबाबत बुधवारी (दि. 6) शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अध्यादेश काढून योजनेस मान्यता दिल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. (Pune Latest News)

महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण 2012 अन्वये प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल उभारणे ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. सद्यस्थितीत इंदापूर येथे क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु खेळाडूंच्या व नागरिकांच्या मागणीनुसार अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्याकरिता तत्कालीन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे विनंती करण्यात आली होती.

Indapur news
Pune Crime News: काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

दरम्यान, मंत्री भरणे यांनी लागलीच हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार सध्याच्या प्रचलित संकुलामध्ये 55 कोटी रुपयांच्या क्रीडा सुविधा उभा करण्याकरिता शासनाने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे .यामध्ये 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्रास मैदान, व्हॉलीबॉल कोर्ट सिंथेटिक, विविध खेळांचे इनडोअर हॉल, फ्लड्स लाइट्स, मुले व मुलींकरिता स्वतंत्र वस्तीगृह, अंतर्गत रस्ते, अद्ययावत व्यायाम शाळा साहित्यासह, स्वतंत्र बॅडमिंटन हॉल, ट्रॅकच्या दोन्ही बाजूस पवेलियन, सुंदर लँडस्केपिंग, पाणीपुरवठा व सोलर, अद्ययावत शूटिंग रेंज, स्क्वॉश कोर्ट, क्लब हाऊस, व्हीआयपी कॉन्फरन्स हॉल आदी क्रीडा सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. बुधवारी शासनाने काढलेल्या अध्यादेशामध्ये बारामती येथील क्रीडा संकुल, बीड येथील जिल्हा क्रीडा संकुल व इंदापूर येथील तालुका क्रीडा संकुलास खास निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून इंदापूरसारख्या ग्रामीण भागात मिनी बालेवाडी क्रीडा संकुल उभा राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे सोपे होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विद्यमान क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सहकार्यातून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रस्तावास मान्यता घेतली आहे. याची माहिती तालुक्यात पोहोचताच तालुक्यातून क्रीडाप्रेमी, खेळाडू, क्रीडासंघटक व नागरिकांनी मंत्री भरणे यांचे आभार व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news