इंदापूर : उजनीतील सहा मोऱ्यांतून ६ हजार क्युसेकने विसर्ग

इंदापूर : उजनीतील सहा मोऱ्यांतून ६ हजार क्युसेकने विसर्ग

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी व शेतीसाठी उजनी धरणातून सहा मोऱ्यांतून भीमा नदीत ६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर वीज निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर पाणीटंचाईचे तीव्र संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औज बंधारा परिसरातील भीमा नदीतील टाकळी जॅकवेलजवळ केवळ आठवडाभर पुरेल, अशी शक्यता आहे.

उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात येण्यासाठी किमान १० ते १२ दिवस लागणार आहेत. औज बंधाऱ्यासोबतच भीमा नदीवरील १४ बंधारेही भरून घेतले जाणार असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सद्य:स्थितीला उजनी धरणात ४५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, सोलापूरसाठी उजनी धरणातील सुमारे ५.५ टीएमसी पाणी वापरले जाणार असून उजनीतील पाणीसाठा १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार आहे. दरम्यान उजनी धरणातून सोलापूरला पाणी सोडल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी धास्तावला आहे.

सध्या उजनी धरणातील पाणीपातळी

एकूण पाणीसाठा – १०९.५१ टीएमसी

उपयुक्त साठा – ४५.८५ टीएमसी

टक्केवारी – ८५.५८ टक्के

विसर्ग : नदी – ६०००० क्युसेक

कालवा – ७०० क्युसेक

बोगदा – ४०० क्युसेक

वीजनिर्मिती १६०० क्युसेक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news