

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशनने होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीच्या विरोधात गुरुवारी (दि. 18) काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ‘आयएमए’चे सदस्य गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संपूर्ण वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहेत. (Latest Pune News)
‘आयएमए’च्या आंदोलनाला सर्व रुग्णालये, वैद्यकीय सहकारी संघटना यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला सीसीएमपी कोर्स उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करून घेण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत. हा निर्णय आरोग्यसेवा व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी व गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे.