भिलारवाडीत मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन

भिलारवाडीत मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील ढाकाळे-जळगाव क. प. रस्त्यावरील भिलारवाडी हद्दीत मुरूमाचे बेकायदा, बेसुमार उत्खनन चालू आहे. उत्खनन करणारा ठेकेदार राज्यातील मोठ्या पक्षाचा बडा आमदार असल्याचे बोलले जात आहे. या बेकायदा प्रकाराबाबत दोन महिला शेतकर्‍यांनी बारामतीचे तहसीलदार कार्यालय व माळेगाव पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला आहे. या बेकायदा उत्खननाबाबत प्रशासन नेमकी काय कारवाई करतेय? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

भिलारवाडी हद्दीत गट नंबर 120 या सामाईक क्षेत्रामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मुरमाचे बेसुमार उत्खनन चालू आहे. या प्रकाराबाबत प्रशासकीय यंत्रणेला तोंडी सांगूनसुद्धा कोणीच दखल घेतली नाही. अखेर बुधवारी (दि. 29) अंजना धनसिंग तावरे (रा. सांगवी, ता. बारामती) व मालन प्रकाश काळभोर (रा. कुरणेवाडी, ता. बारामती) या दोन महिला शेतकर्‍यांनी तहसीलदार बारामती व माळेगाव पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला.

उत्खनन करणारा ठेकेदार मोठ्या पक्षाचा बडा आमदार

संबंधित ठेकेदाराने प्रशासकीय तसेच शेतकर्‍यांची परवानगी घेतली नाही. हा ठेकेदार राज्यातील एका मोठ्या पक्षाचा बडा नेता असल्याने मनमानी करीत आहे. स्वतःच्या आर्थिक हितासाठी बेकायदेशीररीत्या बेसुमार उत्खनन करीत चांगल्या शेताची लचकेतोड केली आहे.

कायदेशीर कारवाई करू : तहसीलदार

भिलारवाडी येथील बेकायदेशीर मुरूम उत्खननाबाबत तहसीलदार गणेश शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news