बेकायदा बांधकाम भोवले; १४ आस्थापनांवर कारवाईचा बडगा

महापालिकचे नियम धाब्यावर बसविल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल
Action has been taken against many unauthorized cafes in Viman Nagar area of ​​Pune
पुण्यातील विमान नगर भागात अनेक अनधिकृत कॅफे वर कारवाई करण्यात आली File Photo

पुणे : कल्याणीनगर पोर्शे कार अपघातानंतर व पुण्यातील एल थ्री पबमधील ड्रग सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरातील बेकायदेशीर बांधकाम झालेल्या आस्थापनांवर (हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट, क्लास) कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेचे नियम धाब्यावर बसवून त्यातच नोटीस बजावूनही अनधिकृत बांधकाम न काढणार्‍या हॉटेल, कॅफे, पब, बार तसेच इतर आस्थापनांच्या 14 आस्थापनांसह त्यांच्या मालकांवर विमानतळ पोलिस ठाण्यात पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Action has been taken against many unauthorized cafes in Viman Nagar area of ​​Pune
Pune Drugs Case | अनधिकृत पबला कुणाचा आशीर्वाद: सुषमा अंधारे

वाढीव बांधकाम केल्याने गुन्हा

पहिल्या गुन्ह्यात विमाननगरमधील सीसीडी चौकातील वाइन्ड शुगर कॅफे, द 3 मस्केटिअर, थोरात बार्बेक्यू, चाटस न वेप्स, स्याश बार, द बानयार्ड कॅफे, टेल्स स्पिरिट हंटर बिस्ट्रो, पिंड पंजाब, द चाय कॅफे यांच्या मालकांवर कनिष्ठ अभियंता अभिषेक कुसाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52, 43 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या आस्थापनांनी अनधिकृत वाढीव बांधकाम केल्याचे आढळल्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.

नोटीस बजावूनही अनधिकृत बांधकाम

दुसर्‍या गुन्ह्यात विमाननगर येथील लाउंज अ‍ॅन्ड बारचे मालक यांच्यावर अनिधकृत पत्राशेडचे बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कनिष्ठ अभियंता अभिषेक कुसाळकर यांना विमाननगर येथे असलेल्या फिनिक्स मार्केट सिटी असलेल्या बॅकस्टेज लाउंज अ‍ॅन्ड बार येथे 14 मीटर बाय 15 मीटरचे पत्राशेड बांधल्याचे निदर्शनास आले. जानेवारी 2022 मध्ये नोटीस बजावूनही अनधिकृत बांधकाम केल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.

पार्किंग व्यवसाय सुरू ठेवल्याने कारवाई

तिसर्‍या गुन्ह्यात पुणे महानगरपालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर पार्किंगचा व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी व नोटीस बजावून अनधिकृत केलेले बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती. त्या अनुषंगाने 23 एप्रिल 2024 रोजी कारवाईदेखील केली होती, तरीदेखील पार्किंग व्यवसाय सुरू ठेवल्याने कारवाई करण्यात आली.

विमाननगर येथील पेठ लोहगाव येथे अनधिकृत बांधकाम करून नुक्कड कॅफे व क्रिस्टाईड्स क्लासेस चालू केल्याने याप्रकरणी सलीम शेख आणि हानिफ शेख (रा. पेठ लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहणीमध्ये 18 बाय पंधरा मीटर व 27 बाय 25 मीटरचे अनधिकृत पत्राशेड मारल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.

'जोशी वडेवाले'ने जमिनीचा वापर बदलला

विमाननगर येथील जोशी वडेवाले यांचे बिपीन घोरपडे यांनी जमिनीचा वापर बदलून निवासीऐवजी व्यापारी वापरासाठी वापरून जोशी वडेवाले हे हॉटेल सुरू केल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news