अंदाजपत्रकात भेदभाव केल्यास आयुक्तांना न्यायालयात खेचू; महाविकास आघाडीचा इशारा

'एकाच पक्षासाठी निधीची तरतूद केल्याचे आढळल्यास महापालिका आयुक्तांना न्यायालयात खेचू'
Mahavikas Aghadi
अंदाजपत्रकात भेदभाव केल्यास आयुक्तांना न्यायालयात खेचू; महाविकास आघाडीचा इशाराfile photo
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये केवळ भाजपच्याच आमदार आणि माजी नगरसेवकाऐवजी सर्वच माजी नगरसेवकांच्या प्रभागांतील कामांसाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करावी. मात्र, एकाच पक्षासाठी निधीची तरतूद केल्याचे आढळल्यास महापालिका आयुक्तांना न्यायालयात खेचू, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मी प्रत्येक विधानसभानिहाय कामांच्या याद्या दिल्या आहेत. आपल्या मोठी तरतूद मिळणार आहे, असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेनेचे निवडणूक समन्वयक वसंत मोरे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे आणि माजी गटनेते अशोक हरणावळ यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली व सर्वच माजी नगरसेवकांना निधी मिळावा, अशी मागणी केली.

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना जगताप म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी भाजप सत्तेचा दुरुपयोग करून आयुक्तांवर दबाव आणून अंदाजपत्रक तयार करण्यात पुढाकार घेत आहे. हा पुणेकर नागरिकांवर अन्याय आहे.

आयुक्तांनी सर्वच माजी नगरसेवकांच्या प्रभागांतील कामांसाठी निधीची तरतूद करावी, अंदाजपत्रकात एकाच पक्षाचा प्रभाव आढळून आल्यास याविरोधात आंदोलनासोबत उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. दरम्यान, सर्वच माजी नगरसेवकांकडून निधीच्या तरतुदीसाठी पत्रे येत असली, तरी प्रशासनाला आवश्यक कामांसाठीच निधीची तरतूद केली जाईल, असे आयुक्त भोसले यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news