

Skull found in Swargate Pune
पुणे: स्वारगेट परिसरातील घोडके चाळ भागात शनिवारी सायंकाळी एका प्लास्टिकच्या पिशवीत मानवी कवटी आणि काही हाडे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. यामुळे काही वेळ पोलिसांचीही धावपळ झाली.
प्राथमिक चौकशीनंतर ही मानवी कवटी आणि हाडे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे असल्याची माहिती समोर आली. तरीही या साहित्याची येथे कशी आणि कोणाच्या मार्फत विल्हेवाट लावण्यात आली, याबाबत स्वारगेट पोलिस अधिक तपास करत आहेत. (Latest Pune News)
ही पिशवी स्वारगेटमधील कालव्यातील पाण्यात आढळून आली. परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन हाडांचा तपास सुरू केला.