पुणे पोलिस आयुक्तालय आवारात दारुच्या बाटल्या कशा? वडेट्टीवार यांचा सवाल

पुणे पोलिस आयुक्तालय आवारात दारुच्या बाटल्या कशा? वडेट्टीवार यांचा सवाल

पुणे : पुणे पोलिस आयुक्तालय आवारात दारुच्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दरम्यान पुढारी न्यूजच्या बातमीचा दाखला देत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अनेक प्रश्न ट्वीटर पोस्ट टाकून उपस्थित केले आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात ऑन ड्युटी दारूचे सेवन केले जाते का?

पुणे पोलिस आयुक्तालय आवारात दारुच्या बाटल्यांचा खच असलेला व्हिडिओ समोर आला आहे. पुणे पोलीस आयुक्तालय आवारातच या दारुच्या बाटल्यांचा खच सापडला हा प्रश्न गंभीर आहे. या धक्कादायक व्हिडीओची दखल घेऊन पोलिस आयुक्तांनी चौकशी करावी आणि पोलिस आयुक्तालय आवारात नेमकं चाललंय तरी काय याबाबत पूर्ण खुलासा पुणेकरांसमोर मांडावा, असेही वडेट्टीवार ट्वीटद्वारे म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news