लॉ कॉलेज रस्ता परिसरातील घरांना सर्वाधिक दर

प्रतिचौरस मीटर सदनिकेचा दर एक लाख 80 हजार 950 रुपये
Pune News
लॉ कॉलेज रस्ता परिसरातील घरांना सर्वाधिक दरFile Photo
Published on
Updated on

पुणे: नोंदणी व मुद्रांक विभागाने पुणे शहरात रेडीरेकनरच्या दरात सरासरी 4.16 टक्के एवढी वाढ केली आहे. त्यानुसार शहरात घर घेण्याच्या द़ृष्टीने लॉ कॉलेज रस्ता हा परिसर सर्वाधिक महागडा ठरला आहे. या परिसरात सदनिकेचा दर प्रतिचौरस मीटर 1 लाख 80 हजार 950 रुपये इतका आहे, तर आॉफिससाठीचा दर 2 लाख 8 हजार 100 रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे.

तर दुसर्‍या क्रमांकावर कोरेगाव पार्क परिसर असून, या परिसरात सदनिकांचा दर 1 लाख 79 हजार 490 रुपये प्रतिचौरस मीटर, तर आॉफिससाठीचा दर हा 2 लाख 6 हजार 420 रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे. राज्यात गेल्या दोन वर्षांत रेडीरेकनरमध्ये वाढ केली नव्हती. यंदाच्या 2025-26 या आर्थिक वर्षात रेडीरेकनरमध्ये वाढ केली आहे. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.

त्यामध्ये शहरातील जमीन, सदनिका, ऑफिस आणि दुकाने यांचे दर देण्यात आले आहेत. त्यातील आकडेवारीनुसार, शहरातील टॉप टेन भागातील दर नोंदणी विभागाने जाहीर केले आहेत. शहरात दुकानांसाठीचा सर्वाधिक महागडा परिसर जंगली महाराज रस्ता असून, या परिसरात दुकानांचा दर 4 लाख 75 हजार 940 रुपये प्रतिचौरस मीटर असा आहे. तर, शहरात जमिनीचा सर्वाधिक कमी दर हा नांदोशी गावात असून, या ठिकाणी 2 हजार 170 रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे. त्याखोलाखाल किरकटवाडी येथे 2 हजार 680 रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news