Pune News: पोलीस विभागाने हेल्मेटसक्तीसंदर्भात काढलेले आदेश महामार्गासाठी आहेत. पुणे शहरात दुचाकींची गती कमी असते, त्यामुळे ही सक्ती पुणे शहरासाठी नाही, यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आहे, असे स्पष्टीकरण कसबा पेठचे आमदार हेमंत रासने यांनी दिले आहे.
गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ-मावस्था निर्माण झाली आहे. परंतु, पुणे पोलिसांकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नसून महामार्गांसाठी वरिष्ठस्तरावरून आदेश काढण्यात आले आहेत.
पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांवर याचा परिणाम होणार नाही. तसेच कारवाई केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितल्याचे आ. रासने यांनी सांगितले.
काय आहे आदेश?
रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू आणि जखमींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129 नुसार हेल्मेट वापरण्याच्या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य पोलिस विभागाने जारी केले आहेत. हेल्मेट न वापरणार्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, दुचाकी चालवणारे वाहनचालक आणि सहप्रवासी अशा दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक असेल.
मृत्यू आणि जखमींच्या प्रमाणात घट होईल
हेल्मेट न वापरणार्या वाहनचालकांवर आणि सहप्रवाशांवर दंड आणि दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हेल्मेटचा वापर केल्यास अपघातांमध्ये होणारे मृत्यू आणि जखमींच्या प्रमाणात मोठी घट होईल, असा विश्वास पोलिस खात्याने व्यक्त केला आहे.