Monsoon Forecast | कोकणात मुसळधार, विदर्भात उष्णतेची लाट

राज्यात २३ जूनपासून मान्सून सक्रिय होणार
IMD Maharashtra Weather Forecast
IMD Maharashtra Weather ForecastAI photo
Published on
Updated on

IMD Maharashtra Weather Forecast

पुणे: राज्यात २३ जूनपासून मान्सून सक्रिय होत आहे. प्रामुख्याने कोकणात २२ ते २५ जूनदरम्यान मुसळधार, तर विदर्भात मात्र उष्णतेची तीव्र लाट सक्रिय होत आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

राज्यात गत १३ दिवसांपासून अडखळलेला मान्सून मंगळवारपासून (दि. २३ जून) सक्रिय होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात २२ ते २५ जूनदरम्यान कोकणात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात याच कालावधीत उष्णतेची प्रखर लाट राहणार असल्याने उष्णलाटांचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

IMD Maharashtra Weather Forecast
Monsoon update | मान्सूनने हुलकावणी दिली, पण २५ जून पासून सक्रीय होणार!

असे आहेत अलर्ट

पावसाचा यलो अलर्ट (दि. २२ ते २५ जून) :

- ठाणे, मुंबई, कोल्हापूर (घाट), कोल्हापूर शहर, सिंधुदुर्ग (२२ ते २५), पुणे शहर (२४, २५), सातारा, सांगली (२३ ते २५), सोलापूर (२२, २३), छ. संभाजीनगर (२४, २५), परभणी (२५)

उष्णतेचा ऑरेंज अलर्ट (हीट वेव्ह दि. २२ ते २५ जून )

- अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news