Pune Heavy Rain | पुणे जिल्ह्यात संततधार; लोणावळ्यात अतिवृष्टी, आगामी ४८ तास घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

Weather Alert | अरबी समुद्राकडून जोरदार वारे राज्यात आल्याने थांबलेला मान्सून सक्रिय
Pune Heavy Rain
पुणे जिल्ह्यात संततधार(File Photo)
Published on
Updated on

Monsoon 2025 Orange Alert Pune

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी (दि.15) रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस लोणावळामध्ये 123 मि.मी.ची नोंद झाली. सोमवारी (दि.16) दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. दरम्यान, आगामी 48 तास जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

रविवारी रात्री अरबी समुद्राकडून जोरदार वारे राज्यात आल्याने थांबलेला मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. पुणे शहरात रात्रभर पाऊस झाला. जिल्ह्यातही बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. लोणावळामध्ये अतिवृष्टी झाली. या हंगामातील सर्वात मोठा 123 मि. मी. पाऊस एका रात्रीत तेथे झाला. तसेच, गिरीवन 84, भोर 80 मि. मी. पाऊस झाला.

Pune Heavy Rain
Pune Bridge Collapse: मालक पाण्यात पडल्यावर छोटू कासावीस! कुंडमळा अपघातात माणुसकीचं हृदयस्पर्शी दर्शन

रविवारी रात्री झालेला पाऊस (मि.मी.)

लोणावळा 123, गिरीवन 84, भोर 80, एनडीए 46.5, लवळे 44, पाषाण 42.5, तळेगाव 32.5, शिवाजीनगर 30.5, चिंचवड 28, मगरपट्टा 27.5, डुडुगळगाव 26.5, हडपसर 25, हवेली 20.5, तळेगाव ढमढेरे 19.5, राजगुरुनगर 16, माळीण 13.5, निमगिरी 12, पुरंदर 8.5, दापोडी 8.5, नारायणगाव 4.5, बारामती 2.5.

सोमवारचा पाऊस (मि.मी.)

कुरवंडे 46.5, लवासा 34.5, माळीण 26, भोर 24, निमगिरी 22, गिरीवन 19.5, लवळे 12, तळेगाव 9.5, चिंचवड 9, एनडीए 8, पाषाण 6.8, डुडुळगाव 6, शिवाजीनगर 5.9, नारायणगाव 4, राजगुरुनगर 3, मगरपट्टा 3, हडपसर 2, हवेली 2, तळेगाव ढमढेरे 1, पुरंदर 0.5, बारामती 0.4.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news