Alandi Rain Update: आळंदीत धुमशान पाऊस; भाविकांना इंद्रायणीत नदीपात्रात न उतरण्याच्या सूचना

भक्ती सोपान पुल पाण्याखाली; स्कायवॉकवरून दर्शनबारीचा प्रशासनाचा निर्णय ठरला योग्य
Alandi Rain Update
आळंदीत धुमशान पाऊस; भाविकांना इंद्रायणीत नदीपात्रात न उतरण्याच्या सूचना Pudhari
Published on
Updated on

आळंदी: आळंदी आज संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. मात्र पहाटे पासून आळंदी पंचक्रोशीत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

धुमशान बरसत असलेल्या पावासामुळे भाविकांचे हाल होत असून जागा भेटेल तिथे आसरा घेत वारकरी पावसापासून आपला बचाव करताना दिसत आहेत.अगोदर दर्शनबारी उभारण्यात आलेला भक्ती - सोपान पुल पाण्याखाली गेला आहे. (Latest Pune News)

Alandi Rain Update
Sassoon Hospital: ससूनमधील मयत पास केंद्र दोन दिवसांपासून बंद

यामुळे अगोदरच याची सतर्कता बाळगत प्रशासनाने स्कायवॉक वरून दर्शन बारी वळविण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला असल्याचे मत आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांनी व्यक्त केले आहे.

मावळातील जाधववाडी तलाव शंभर टक्के भरला असून यातून इंद्रायणी नदी पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे.यामुळे इंद्रायणीची पाणी पातळी वाढणार आहे.अशावेळी देहू आणि आळंदीतील भाविकांनी इंद्रायणी नदी पात्रात जाऊ नये असा इशारा पाठबंधारे विभागाने दिला आहे.आळंदीत देखील मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविकांना सूचना देत पाण्यात न पाण्याची विनंती केली आहे.

Alandi Rain Update
Pune: ड्रेनेजची झाकणे फोडून बांधकामाचं पाणी गटारात; नियमांचे खुलेआम उल्लंघन

पोलिस प्रशासनाच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर अधिकचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जीवरक्षक पाण्यात तैनात करण्यात आले आहेत. नदीपात्रात दोन बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news