Weather Update: काळजी घ्या! कोकण, मध्य महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा

यवतमाळ 41.2 अंशांवर; देशात सर्वोच्च
Heatwave Alert
काळजी घ्या! कोकण, मध्य महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशाराFile Photo
Published on
Updated on

पुणे: गतवर्षीपेक्षा यंदा किमान आठ ते दहा दिवस उशिरा राज्यातील कमाल तापमानाने चाळिशी गाठली. विदर्भातील यवतमाळ शहराचा पारा शुक्रवारी (दि.7) 41.2 अंशांवर गेल्याने देशात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. कोकणात 8 ते 11 मार्च तर मध्यमहाराष्ट्राला 11 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात पुणे शहरातील कोरेगावा पार्क आणि लोहगाव सतत 38 ते 39 अंशांवर होते. विदर्भातील पारा त्या तुलनेत कमी होता. मात्र शुक्रवारी यवतमाळ शहराच्या तापमानात 4 अंशांनी वाढ झाली आणि राज्यासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पुणे शहरातील कोरेगाव पार्क 39.7, रत्नागिरी, सोलापूर येथे 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कोकण मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट

कोकणात उष्ण व दमट वातावरण तयार झाल्याने हवामान विभागाने कोकणासह गोवा राज्याला 8 ते 11 मार्च पर्यंत तर मध्यमहाराष्ट्राला 11मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

शुक्रवारचे राज्याचे तापमान

यवतमाळ 41.2, कोरेगावा पार्क (पुणे) 39.7, लोहगाव (पुणे) 38, रत्नागिरी, सोलापूर 38, सातारा 37, सांगली 37.4, कोल्हापूर 36.6,पुणे (शिवाजीनगर) 36.4, जळगाव 36.3, महाबळेश्वर 33.2, मालेगाव 35.2, नाशिक 34.9, मुंंबई 34.5, अलिबाग 36.6, छ. संभाजीनगर 36.2, बीड 36, अकोला 37.4, अमरावती 37.2, बुलडाणा 34.5, ब्रम्हपुरी 35.5, चंद्रपूर 36.4, गोंदिया 33.3, नागपूर 36.5, वाशिम 37.6, वर्धा 37.6

देशात शुक्रवारी तापलेली शहरे

मदुराई 38.6, भूज 37, चेन्नई 37.7, राजकोट 37.8

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news